पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर- पंढरपूर- टेंभुर्णी- स्वारगेट जाणारी बससेवा छ.शिवाजी महाराज चौकातून सुरू झाल्याची माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
ग्राहक पंचायतीने अनेक दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाकडे करकंब-टेंभुर्णी मार्गे स्वारगेटकडे जाणारी बस सेवा छ. शिवाजी महाराज चौकातून लिंक रोड, कॉलेज चौक या मार्गाने सोडावी अशी मागणी केलेली होती. त्याप्रमाणे सोमवार दि.१४ आक्टोबर पासून पहाटे ५-४५ ची बससेवा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झाली आहे.
या बस सेवेच्या प्रारंभी चालक रवी नवले व वाहक अरबाज शेख यांना अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास जिल्हा संघटक दीपक इरकल, जिल्हा सचिव सुहास निकते, तालुका उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे,सदस्य विठ्ठल ऐतवाडकर यांनी पुष्पगुच्छ देवुन शुभेच्छा दिल्या.
ही बस दररोज पहाटे ५-४५ वा.छ.शिवाजी महाराज चौक, ठाकरे चौक, लिंक रोड, कॉलेज चौक, सरगम चौक, करकंब-टेंभुर्णी मार्गे स्वारगेटकडे जाईल. तेथून परतीच्या प्रवासासाठी ११-४५ वा निघून याचमार्गे पंढरपूरला पोहचेल.
पंढरपूरला येणाऱ्या भाविकांची, जेष्ठ नागरिक, स्थानिक प्रवाशांची यामुळे चांगली सोय झालेली आहे.तरी या सेवेचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन आगार प्रमुख योगेश लिंगायत, स्थानक प्रमुख अंकुश सरगर, ग्राहक पंचायतीचे प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते, सदस्य सुभाष सरदेशमुख, तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये,सचिव प्रा.धनंजय पंधे,जिल्हा सदस्य अण्णा ऐतवाडकर,पांडुरंग अल्लापूरकर, तालुका सदस्य श्रीराम साळुंखे, सागर शिंदे, अंकुश वाघमारे सतिश निपाणकर यांनी केले आहे.
ही बस सुरू होण्यासाठी सहा. वाहतूक अधिकारी नवनाथ दळवे, व.सहा.समाधान मेटकरी, सुमित भिंगे यांनी विशेष परिश्रम घेतले.