पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
अर्जुन भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर विभाग, पंढरपूर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली दि. २८/०९/२०२४ रोजी २१/४५ वा. चे सुमारास गुन्हे प्रकटीकरण पथकासह पो. ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असता गुप्त बातमीदाराकरवी माहिती प्राप्त झाली की, शहरातील दुध पंढरी समोर इसबावी येथे एक इसम हा त्याचे जवळ देशी बनावटीचे रिव्हॉल्वर बाळगुन फिरत आहे.
सदर बातमी बाबत वरिष्ठांना हकीकत सांगून सदर प्राप्त माहितीची खातरजमा करुन कारवाई करणेकामी पथक तात्काळ रवाना केले सदर ठिकाणी सापळा रचून संशिईत इसम नाव योगेश मारूती खंडागळे वय-२६वर्ष, रा. खंडाळी, ता. माळशिरस, जि. सोलापूर यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेस एक देशी बनावटीचे रिव्हॉल्वर मिळून आले असल्याने ते पुढील कारवाई कामी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुरनं. ५९४/२०२४ भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, २५, अन्वये गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आले आहे.
सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर अर्जुन भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर विभाग, पंढरपूर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि आशिष कांबळे, सपोफौ राजेश गोसावी, सपोफौ/नागनाथ कदम, सपोफौ / शरद कदम, पोहेका /१०६३ बिपीनचंद्र ढेरे, पोहेकॉ/३९६ सुरज हेंबाडे, पोहेकॉ / ३९८ सिरमा गोडसे, पोहेकॉ/१७८९ सचिन, हॅबाडे, पोहेकॉ/४९३नवनाथ माने पोहेकॉ/६०१ नितीन पलुसकर, पोकॉ/१५१३ बजीरंग बिचुकले, पोकॉ / २१९० समाधान माने, पोकॉ/१२१६ शहाजी मंडले, पोकॉ/१९०४ निलेश कांबळे व सायबर विभागाचे पोका / योगेश नरळे यांनी केली असून सदर गुन्हयांचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक आशिष कांबळे हे करीत आहेत.