सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सध्या स्वस्त धान्य दुकानातील तांदळात प्लॅस्टीकचे तांदूळ मिळत असलेबाबत ग्राहक दुकानदारांना विचारणा करत आहेत. मात्र रेशनिंग दुकानामधून मिळणारा तांदूळ हा फोर्टीफाईड तांदूळ आहे. स्वस्त धान्य दुकानामधून घरी आणलेल्या तांदूळ पाण्यावर तरगंत असल्याचे काही ग्राहक सांगतात. प्लॅस्टीक सारखा दिसणारा तांदूळ चावून पाहिल्याने वेगळी चव वाटत असल्याचे अनेक जण सांगतात. केंद्र शासनाच्या अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत हा फोर्टीफाईड तांदूळ सर्व स्वस्त धान्य दुकानातून वितरीत करण्यात येत आहे. प्लॅस्टीकसारखा दिसणारा हा फोर्टीफाईड तांदूळ आरोग्यास घातक नसून आरोग्यासाठी फायदेशिर आहे.अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
फोर्टीफाईड तांदूळामध्ये पोषकयुक्त घटक आहेत. सामान्य तांदळापेक्षा फोटीफाईड तांदूळ अधिक पोषक असून शरीरास आवश्यक पोषक तत्वांची पुर्तता फोर्टीफाईड तांदूळ करतो. शरीरात पोषक तत्वाचे घटक कमी असतील तर फोर्टीफाईड तांदूळ खाल्याने पोषणतत्वाचे कमतरता दूर करण्यास मदत मिळेल. फोर्टीफाईड तांदूळ मध्ये थलोसिमिया, सिकलसेल, अनेमिया असे आजार रोखण्यासाठी उपयुक्त आहे. फोर्टीफाईड तांदळामध्ये लोह, फॉलिक अॅसीड, व्हिटॅमिन बी-12 चे सूक्ष्म अन्नद्रव्य असून आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे. वजनाने हलके असल्याने ते पाण्यावर तरंगतात फोर्टीफाईड तांदळाबाबत लाभार्थ्यांना शंका किंवा अडचणी असल्यास आपले तहसिल कार्यालयात पुरवठा विभागाशी संपर्क करण्यात यावा. फोर्टीफाईड तांदूळ हे तांदळाच्या पिठापासून बनलेले असतात. ज्यात आरोग्यासाठी आवयश्यक सूक्ष्म पोषक घटक असतात. प्रथम तांदळाचे भुकटी तयार केली जाते आणि त्यात लोह, फॉलिक अॅसीड, व्हिटॅमिन बी-12 चे सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण केले जाते. या मिश्रणाला पुन्हा तांदळाचा आकार दिला जातो. यालाच फोर्टीफाईड तांदूळ म्हणतात. 100 किलोमध्ये 1 किलो फोर्टीफाईड तांदूळ मिसळून वितरीत केला जातो.
फोर्टीफाईड तांदळाचे जनजागृती करणेबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सर्व तहसिलदार यांना लेखी कळविण्यात आलेले आहे. तसेच शासनामार्फत प्राप्त चलचित्र देखील प्रसारमाध्यमामधून प्रसारीत करण्यात आलेले आहेत. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2023 पासून गुणसंवर्धित तांदळचा (फोर्टीफाईड तांदूळ) वितरण करण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांनी या तांदळाविषयी उठवणा-या अफवांविषयी विश्वास ठेवू नये. शासनाने फोर्टीफाईड तांदळाच्या शुध्दतेचे व पौष्टीकतेचे सर्व निकष तपासलेले आहेत आणि शासनाने ते मान्य केलेले आहेत.