जोगेश्वरी पूर्व पूनम पाटगावे तेज न्यूज
जोगेश्वरी पूर्व येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक,पत्रकार गणेश हिरवे यांना आदर्श रायगड या वृत्त पात्राच्या वतीने येत्या २९ सप्टेंबर रोजी अंबरनाथ येथे होणाऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने समजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
हिरवे यांचे काम चांगले असुन आतापर्यंत त्यांचे सामजिक, शैक्षणिक, पत्रकारिता मधील योगदान पाहता अनेक संस्थांनी त्यांना वेळोवेळी गौरविलेले आहे.करोना काळात हिरवे यांनी जबरदस्त काम केले होते व हजारो गरजू कुटुंबीयांना किराणा सामान, आरोग्य किट आणि जीवनावश्यक वस्तू पुरविल्या होत्या.अनेक नागरी समस्या सोडिण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात.
पुरस्कार जाहीर झाल्याने अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले असून सध्या शरीर अस्वस्थमुळे ते कार्यक्रमाला उपस्थित न राहता हिरवे यांचे वतीने त्यांचे मित्र सुनील वडतकर सदर पुरस्कार स्वीकारणार असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक शैलेश सणस, अविनाश म्हात्रे, रमेश सणस यांनी कळविले आहे.