सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
मातृतीर्थ सी राजा जिजाऊ सृष्टी येथे २० व २१ सप्टेंबर या दोन दिवशीय निवासी राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेसाठी लोकलवंतांनी उपस्थित राहावे.असे आवाहन शाहीर सुभाष गोरे यांनी केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात विविध लोककला अस्तित्वात आहेत त्या लोककले द्वारे समाजाला मनोरंजनातून प्रबोधन करून लोकशिक्षण देऊन आदर्श समाज निर्मितीत पारंपरिक लोककला व सादर करणारे लोककलावंत यांचे खूप मोठे योगदान आहे परंतु हाच लोककलावंत राजाश्रय नसल्याने, शासन दरबारीं उदासीन धोरण असल्याने, असंघठीत असल्याने आज उपेक्षित व न्याय हक्कापासून वंचित, शोषित व पीडित जीवन जगत आहे. भारत सरकारच्या गीत व नाटक प्रभाग, केंद्रीय संचार ब्युरो मार्फत निवड व नोंदणीकृत कलापथक, कला संच तसेच महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसपंर्क संचालनालय अंतर्गत असलेले कलासंच, कलापथक यांचे राज्यस्तरीय नोंदणीकृत लोककलावंत संघटना म्हणजे "लोककलावंत प्रबोधन परिषद, महाराष्ट्र राज्य " यांचे वतीने बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांचे जन्म स्थळ माहेर म्हणजेच मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील मराठा सेवा संघ स्थापित जिजाऊ सृष्टी येथे दिनांक २० व २१ सप्टेंबर २०२४ रोजी दोन दिवशीय लोक कलावंत कार्यत्मक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
सदर कार्यशाळेत प्रशिक्षित प्रवीण प्रशिक्षकांमार्फत सहभागी लोक कलावंताना सत्र निहाय कार्यात्मक प्रशिक्षण दिले जाणार आहे.
सदर कार्यशाळेत लोकसंघठन, संघटना बांधणी, पदाधिकारी भूमिका जबाबदारी,राज्य सांस्कृतिक धोरणात लोककला आंतर्भाव, शासन दरबारी लोककलावंताना मिळणारा न्याय, आंदोलनात्मक भूमिका,भविष्य वेध व नियोजन या बाबत सामूहिक चर्चात्मक सहभागीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी कलावंताना दि १९ सप्टेंबर २०२४ पर्यंत आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यायोगे संयोजन समितीला महाराष्ट्र राज्यातून येणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांची निवास, भोजन, चहा नाश्ता, प्रशस्तीपत्र, आवश्यक सेवा पूरविने सोईचे होईल. यासाठी सादर कार्यशाळेत लोककलावंतांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजन समिती कार्याध्यक्ष शाहीर डी आर इंगळे, राज्यसमन्व्यक तथा कोषाध्यक्ष प्रा गजेंद्र गवई, महिला कळावंत राज्य प्रमुख सौ सुनीता खरात, लोकजागर चे प्रवीणभाऊ गिते, पत्रकार रामदास कहाळे, ठाकरे, झोटे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.