भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
भाळवणी येथील यशश्री अकॅडमी ने गेली दहा वर्षाची आपली यशस्वी परंपरा जपत उज्वल यश संपादन केले आहे अकॅडमीच्या तब्बल 27 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन उज्वल यश संपादन केले आहे.
अकॅडमी मध्ये प्रथम क्रमांक संचिता संभाजी शिंदे 97.60%, द्वितीय क्रमांक आदित्य बबन गोसावी 96.40%, व तृतीय क्रमांक श्रावणी बापुसो जाधव 95.60% या विद्यार्थ्यांनी पटकावत अकॅडमीच्या नावलौकिकात भर टाकली.
अकॅडमीचे 41 विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणी घेऊन यशस्वी झाले आहेत. यामुळे भाळवणी व पंचक्रोशीतून अकॅडमीच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
अकॅडमीच्या या उज्वल यशामागे अकॅडमीचे संचालक प्रवीण लिंगडे , रणजीत लोखंडे , राजवर्धन देठे , योगेश भुसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच पालक वर्गाचे ही विशेष सहकार्य लाभले.


