रोपळे मंडलमध्ये ईव्हीएम मशीन मतदान प्रत्यक्षिक
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती व्हावी, त्याचप्रमाणे ईव्हीएम मशीनव्दारे मतदानाची प्रक्रिया मतदारांना समजावी या दृष्टीकोनातून सुरू करण्यात आलेल्या मतदान जनजागृती प्रत्यक्षिक मोहिमेमुळे नवमतदारांसह मतदारांना प्रेत्साहन मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान वाढवण्याचा या मोहिमेचा उद्देश सफल होईल. असे प्रतिपादन रोपळे मंडलचे मंडल अधिकारी बाळासाहेब कदम यांनी केले.
प्रंताधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार विनोद रनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली माढा विधानसभा मतदारसंघामध्ये येणार्या रोपळे मंडलमधील रोपळे , पांढरेवाडी, गुरसाळे , चिलाईवाडी आदी गावांमध्ये ईव्हीएम मशीनव्दारे मतदान कशा पध्दतीने करावे याबाबतची माहिती देण्याचे जनजागृती अभियान पार पडले. यावेळी मंडल अधिकारी कदम बोलत होते. या अभियानासाठी रोपळे सजाचे तलाठी दांडगे, पांढरेवाडी व चिलाईवाडी सजाचे तलाठी काचरे, गुरसाळे सजाचे तलाठी गुटाळ यांच्यासह महोदव भोसले, किशोर काकडे, संभाजी कदम, उमेश भोसले,जाधव, माने, राजाभाऊ इंगळे , नागनाथ भडकवार व गावचे लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरीक, नवमतदार यांच्यासह ग्रमस्थ उपस्थित होते.
या अभियानाबाबत माहिती देताना मंडल अधिकारी कदम यांनी सांगितले कि, रोपळे मंडलमधील सुमारे दोन ते तीन हजार नागरीकांपर्यंत हि जनजागृती मोहिम पोहचली असून याव्दारे मतदान प्रक्रियेबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात येत आहे. यामध्ये ईव्हीएम मशीन ची प्रक्रिया समजावून सांगण्यात येत आहे. यामुळे मतदारांना मतदान प्रक्रिये बाबत माहिती तर मिळतच आहे. परंतु मशीनव्दारे मतदान हि अवघड वाटणारी प्रक्रिया सुलभ असल्याचे जाणवून मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होणार आहे. लवकरच मंडलातील इतर गावांमध्येही हि मोहिम राबवण्यात येणार आहे. असे कदम सांगितले.
नवमतदारांच्या उत्सुकतेसाठी मोहिम सकारात्मक.....
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक नवमतदार आपला पहिला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये या ईव्हीएम मशीनव्दारे होणार्या मतदान प्रक्रिये बाबत मोठी उत्सुकता झालेले आहे. त्यांच्या उत्सुकतेला त्यांच्या मनामध्ये असणार्या प्रश्नांना दिलासा देण्यासाठी हि मोहिम सकारात्मक ठरणार असून या मोहिमव्दारे प्रत्यक्षिक केल्याने प्रत्यक्ष मतदान करताना मोठी सुलभता निर्माण होणार आहे.