पंढरपुरातील महामंडळाच्या उपकेंद्राचे 29 सप्टेंबरला होणार उदघाटन
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रात 1 लाख मराठा उद्योजक संख्या पूर्ण झाली आहे. महामंडळाचे 1 लाख लाभार्थी उद्योजकांची संकल्पपूर्ती करण्यात आली आहे. आणखी मराठा उद्योजकांची संख्या वाढावी. उद्योग व्यवसाय वाढीस लागावेत. या दृष्टिने यानिमित मराठा उद्योजकांचा जिल्हास्तरीय लाभार्थी मेळावा आणि पंढरपूर उपकेंद्राच्या उदघाटनाचा कार्यक्रम दि. 29 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित पंढरपूर येथे आयोजित केला असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली.
महामंडळ योजनांच्या माध्यमातून आजपर्यंत 1,07213 लाभार्थी झाले असून, 8990 कोटी रुपये विविध बँकानी कर्ज वितरित केले आहे. त्यापैकी महामंडळाने 867 कोटी रुपये व्याज परतावा केला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजने अंतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या बँकांचा सत्कार व तसेच नाविन्य पूर्ण व्यवसाय करणार्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
1 लाख लाभार्थी उद्योजकांची संकल्पपूर्ती मेळाव्यात महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मंत्री महोदय यांचेबरोबर शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी, नॅशनल बैंक, खाजगी बैंक, व सहकारी बँकांचे प्रमुख, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, अधिकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी, लाभार्थी यांनी तसेच अन्य संबंधीतानी दिलेल्या सहकार्याबद्दल त्याचेही आभार व्यक्त केले. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रात 1 लाख मराठा उद्योजक संख्या पूर्ण झाली. त्यानिमित 1 लाख मराठा उद्योजक जिल्हास्तरीय लाभार्थी मेळावा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने आयोजित केला आहे. दि. 29 रोजी मेळावा व पंढरपूर येथील उपकेंद्र उदघाटनास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. समाधान आवताडे, त्याचबरोबर जिल्ह्यातील आमदार उपस्थित असणार आहेत. उपकेंद्र उदघाटन सकाळी 10 वा. हॉल क्र.7, इंदिरा गांधी चौक, शॉपिंग सेंटर, लोकमंगल बँकेच्या शेजारी पंढरपूर या ठिकाणी होणार आहे. तर मेळावा सकाळी 10:30 वा. श्रीयश पॅलेस ,कोर्टी रोड पंढरपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
सोलापूर जिल्हात 10184 लाभार्थी
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनांच्या माध्यमातून आजपर्यंत सोलापूर जिल्हात 10184 लाभार्थी झाले असून 815 कोटी रुपये विविध बँकानी कर्ज वितरित केले आहे व त्यापैकी महामंडळाने 79 कोटी पेक्षा जास्तीचा व्याजपरतावा केला असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगीतले.