श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर वतीने गणेशोत्सव संगीत महोत्सवामुळे जपली सांस्कृतिक परंपरा
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके साहेब आणि सर्व सन्माननीय सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या अथक परिश्रमातून प्रतिवर्षाप्रमाणे सुरू असलेल्या श्री संत तुकाराम भवन येथे श्री गणेशोत्सव संगीत महोत्सवात सहावे पुष्प महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक पं.रघुनंदन पणशीकर यांनी गुंफून गणेशोत्सव संगीत महोत्सवाची सांगता केली.
सुरुवातीला कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके साहेब.यांनी सहप्नीक सदस्या शकुंतला नडगिरे मॅडम व्यवस्थापक मनोज श्रोत्री.गायक रघुनंदन पणशीकर भरत कामत सोहम खंडाळकर यांच्या शुभहस्ते विठूरायाच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीला वारकरी संप्रदायाचा बीज मंत्र जय जय राम कृष्ण हरी गजराने वातावरण भक्तीमय होत.गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांनी अजरामर केलेल्या काही रचना त्यामध्ये अवघा तो शकुन.जणी जाय पाणीयासी.अहो नारायणा.बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल.भाग्यदा लक्ष्मी बारंम्मा गाऊन शेवटी अवघा रंग एक झाला भैरवी गाऊन कार्यक्रमाची सांगता केली.त्यांना तितकीच सुंदर आणि साजिशी साथसंगत तबला भरत कामत हार्मोनियम शुभमम खंडाळकर पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे टाळ अपर्णाताई पणशीकर माऊली खरात यांनी केली.अविस्मरणीय कार्यक्रम लक्षात राहील असा झाला.सुत्रसंचलन विक्रम बिस्किटे सरांनी केले.
यावेळी पंढरपूर व पंढरपूर पंचक्रोशीतील कला रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.असेच सुंदर कार्यक्रम सादर करावेत अशी रसिक श्रोत्यांनी विनंती करत भरभरून प्रतिसाद दिला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी अधिकारी आणि कर्मचारी अधिक परिश्रम घेतले गणेशोत्सव संगीत महोत्सवात रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उदंड प्रतिसाद देत आनंद लुटला असेच कार्यक्रम आयोजीत करावेत अशा भावना पंढरपूर कला रसिक श्रोत्यांनी व्यक्त केल्या.