जागर स्वच्छता अभियान टीम.रामभाऊ जोशी हायस्कूल स्काऊट गाईडचे विद्यार्थी.श्रीराम गणेश मंडळ.युगंधर आखाडा. ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी.प्राथमिक शिक्षक.यांनी घेतला पुढाकार
पंढरपूर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी डॉ अर्जुन भोसले यांनी केले स्वच्छतादुतांचे अभिनंदन
करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
करकंब येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम साहेब.उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव.ईशाधीन शेळके साहेब.जिल्हा व्यवस्थापन प्रमुख सचिन जाधव.यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एक दिवस गावांसाठी स्वच्छता अभियान या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून करकंब येथील ऐतिहासिक बारव चकाचक करण्यात आली.
यावेळी जागर स्वच्छता अभियान टीमच्या वतीने करकंब मधील सर्व सामाजिक संस्था आणि शाळांना आवाहन केल्याप्रमाणे आज रामभाऊ जोशी हायस्कूलचे महादेव पुजारी व स्काउट्स गाईडचे विद्यार्थी.युगंधर आखाड्याचे राजू अनवते.श्रीराम बाल गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष ऋषी पवार.ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी.प्राथमिक शिक्षक.तसेच ग्रामस्थांच्या सहभागातून स्वच्छता करण्यासाठी स्वप्नवत वाटणारी शिवकालीन ऐतिहासिक बारव बघता बघता अडीच तास अथक परिश्रमातून चकाचक करण्यात आली.गेल्या तीन वर्षांपासून जागर स्वच्छता अभियान टीमच्या वतीने प्रत्येक रविवारी दोन तास एका भागाची स्वच्छता करीत असताना आज या आवाहनाला प्रतिसाद देत असताना सर्वांनी अनमोल योगदान दिलं.याचवेळी करकंब पोलीस स्टेशनचे एपीआय सागर कुंजीर यांनी भेट देऊन या उपक्रामाचे कौतुक करुन स्वच्छतादुतांना प्रोत्साहन दिले.तसेच गणपती बाप्पा आणि गौरी विसर्जन निमित्ताने निर्माल्यही गोळा करून गांडूळ खत निर्मिती प्रकल्पास दिले.त्यामुळे पाणी प्रदूषित होण्यापासून पर्यावरण रक्षणासाठी जागर टीमने पुढाकार घेतला.यापुढील काळातही पर्यावरण रक्षणासाठी आणि स्वच्छता करण्यासाठी सदैव कार्यरत राहून करकंब गाव स्वच्छ दिसण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.यासाठी करकंब ग्रामस्थांच अनमोल योगदान लाभणार यांचा विश्वास वाटतो.
यावेळी कचरा रस्त्यावर टाकू नका.शौचाला उघड्यावर बसू नका.प्लास्टिक पिशव्या वापरु नका.याचीही जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.यासाठी संकल्पिका अंजली टकले . वृषाली बोधे.सविता दुधाणे.कविता शेटे.पूजा रणदिवे.बापू खारे.रमेश खारे.नागेश खारे.संतोष भोसले.दत्तात्रय खंदारे.पत्रकार लक्ष्मण जाधव.देविदास काटवटे.युगंधर टीमचे राजू अनवते.श्रीराम टकले. करकंब ग्रामपंचायत 8 स्वच्छता कर्मचारी.स्काऊट गाईडचे 25 विद्यार्थी यांनी ही स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.