माळशिरस प्रतिनिधी तेज न्यूज
श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर कारखान्याची ५७ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी काकासाहेब व आक्कासाहेब आणि पप्पासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ सभासदांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. श्री. विजयसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे आमदार तथा श्री शंकर सहकारी कारखान्याचे चेअरमन मा.श्री. रणजितसिंह मोहिते पाटील, माढा लोकसभेचे लोकप्रिय खासदार मा. श्री. धैर्यशील मोहिते पाटील, जि प माजी उपाध्यक्ष मा. श्री. बाबाराजे देशमुख, शिवामृत दूध व्हा. चेअरमन दत्तात्रय भिलारे भाऊ, महर्षी कारखान्याचे व्हा. चेअरमन शंकराराव माने देशमुख, माजी व्हा. चेअरमन प्रकाश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मा. श्री. मामासाहेब पांढरे, जेष्ठ नेते गणपतराव वाघमोडे, सहकार महर्षी चे संचालक रामचंद्र सावंत पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती मा. श्री. अर्जुनसिंह मोहिते पाटील, विश्वतेजसिंह मोहिते पाटील, जि. प. सदस्य राहुलबापू वाघमोडे, अरुण तोडकर, पं. स. सदस्य मानसिंग मोहिते, म्हसवड चे माजी नगराध्यक्ष विलास माने, माजी उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, उपनगराध्यक्ष अतुल पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चेअरमन रणजितदादांनी बोलताना सांगितले की, आपल्या कारखान्याने FRP २१९२ असतानाही २६०० रु म्हणजेच ४०८ रु ज्यादा दर शेतकऱ्यांना दिला असून आज अजून ५० रु प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले. सभेतील सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
तसेच यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन मिलिंद कुलकर्णी यांनी सभेचे प्रास्ताविक केले, तर सभेचे विषय वाचन जनरल मॅनेजर रविराज जगताप यांनी केले व आभार संचालक सुनील माने यांनी मानले.
यावेळी सहकार महर्षी कारखान्याचे संचालक, श्री शंकर सहकारी चे संचालक, शिवामृत दुध संघांचे संचालक, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक, जि. प. सदस्य व पं. स. सदस्य, कारखान्याचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर स्वरूप देशमुख, कार्यकारी संचालक अभिजित डुबल, सरपंच, उपसरपंच, शेतकरी सभासद, व्यापारी, ग्रामस्थ, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.