सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून उभं आयुष्य सर्वसामान्य माणसांच्या त्याचबरोबर अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त वंचित पीडित घटकांच्या न्याय हक्कासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रशासन दरबारात आपल्या वृत्तपत्रातून आवाज काढत समाजाचा आरसा समजून न्याय देण्याची भूमिका पार पाडणाऱ्या राज्यातील यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्राच्या अनेक संपादकांचे वय झाल्याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत आहेत साप्ताहिक वृत्तपत्र राज्य शासनाच्या यादीवर नसल्याने राज्य सरकारच्या जाहिराती मिळत नाहीत त्यामुळे यादीवर नसलेल्या वृत्तपत्राच्या संपादकाची अवस्था आज अतिशय बिकट व दयनीय झालेली आहे उभं आयुष्य समाजाच्या विकासासाठी भल्यासाठी खर्ची घालणाऱ्या संपादकाची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली अनेक वर्षांपासून साप्ताहिक वृत्तपत्र चालवत असताना वयोवृद्ध व आजारपणात औषधाचा खर्च देखील भागवता येत नाही.
कोरोना सारख्या जीव घेण्या रोगात देखील राज्यातील साप्ताहिकाच्या संपादकानी आपले कुटुंब बाजूला सारून राष्ट्रीय कर्तव्य समजून राज्य सरकारचे जनतेच्या हितासाठी असलेले आदेश निर्देश त्याचबरोबर कोरोना महामारी संदर्भातील आपला जीव धोक्यात घालून वार्तांकन केले आहे अशा राज्यातील साप्ताहिकाच्या संपादकाची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे.महाराष्ट्र राज्यातील यादीवर नसलेल्या व जेष्ठ असलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रा च्या संपादकांना दरमहा वीस हजार रुपये पेन्शन मिळणे बाबत पत्रकार सुरक्षा समिती वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे राज्य सचिव डॉ आशिषकुमार सुना सोलापूर जिल्हा अध्यक्ष संतोष म्हेत्रे जिल्हा संघटक आन्सर तांबोळी (बी एस ) जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार मोहोळ तालुका अध्यक्ष बंडू तोडकर तालुका उपाध्यक्ष शुक्राचार्य शेंडेकर सचिव शहाजी शिंदे सोलापूर शहर अध्यक्ष राम हुंडारे दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद जेष्ठ पत्रकार बाबा काशीद सतीश गडकरी सिद्धेश्वर भालेराव रवी रणदिवे रिजवान शेख इम्तियाज अक्कलकोटकर मधूकर खडतरे इत्यादी पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.