सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
दि. 29 ऑगस्ट 2024 रोजी सिंहगड पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज केगाव सोलापूर येथे राष्ट्रीय क्रीडा दिन व मेजर ध्यानचंद यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. सिंहगड पब्लिक स्कूल मध्ये नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्याची प्रचीती म्हणजे यावर्षी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पालकांसाठी सिंहगड पेरेंट्स क्रिकेट चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली व यासाठी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळाला . या स्पर्धेचे उद्घाटन हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद व ऑलिंपिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचे फोटो पूजन करून करण्यात आले.
या पालकांसाठी आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये सिंहगड वॉरियर्स, सिंहगड रायडर्स, सिंहगड चॅलेंजर्स, सिंहगड लायन्स, सिंहगड ईगल्स असे पाच संघ सहभागी झाले होते. या स्पर्धा लीग पद्धतीने खेळवण्यात आल्या. सर्वच सामने खूपच रंगतदार व चुरशीचे झाले यामध्ये सिंहगड रायडर्स आणि सिंहगड ईगल्स या संघामध्ये अंतिम सामना झाला व अंतिम सामन्यांमध्ये सिंहगड रायडर्स या संघाने बाजी मारली व सिंहगड पेरेंट्स क्रिकेट चॅम्पियनशिप वर कब्जा मिळवला तर सिंहगड ईगल्स संघाला उपविजेतेपद मिळाले.
या सर्व आयोजनासाठी संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय नवले सर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच शाळेच्या प्राचार्या निखहत शेख व उपप्राचार्य प्रकाश नवले तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.