पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सध्याच्या धकाधकीच्या जीवनाशैलीमुळे हृदयामध्ये होणाऱ्या आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशा अजारांवर अधुनिक उपचार पध्दती उपलब्ध आहेत. परंतु त्या उपचार पध्दती तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य वेळी घेतल्या तर हे अजार टाळता येतात. असे हृदयरोग तज्ञ डॉ .बसवराज सुतार यांनी केले.
पंढरपूर येथील सावरकर चौकनजीक असणार्या हृदयस्पंदन हार्ट केअर क्लिनीकच्यावतीने आयोजीत करण्यात आलेल्या हृदयरोग तपासणी शिबीराप्रसंगी डॉ .बसवराव सुतार मार्गदर्शन करत होते. पुढे बोलताना त्यांनी हृदय रोगाची लक्षणे, हृदय रोगांवर होणारे प्रथमिक उपचार, सध्याची अधुनिक उपचार पध्दती यावर विशेष माहिती दिली.
शिबीराचे उद्घाटन प्रसंगी वर्षाताई शिंदे, डॉ.बसवराज सुतार, ब्रम्हानंद सुतार, डॉ .स्नेहलता घाडगे, महेंद्र कांबळे ,हणमंत सुतार, ईराण्णा सुतार, ओंकार सुतार आदींसह इतर मान्यवर उप स्थित होते. तर शिबीरासाठी डॉ.जाधव, डॉ.गवळी, डॉ .करण व्होरा, डॉ .वांगीकर यांचे विशेष सहकार्य मिळाले.
शिबीरामध्ये शंभर रूग्णांची हृदयरोग तपासणी करण्यात आली. यामध्ये ३० रूग्णांचा टुडी ईकोही करण्यात आला. तर ३५ रूग्णांची इसीजी तपासणी करण्यात आली.