सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
केगांव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील ९ विद्यार्थ्यांची 'टीसीएस' या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली आहे. यामध्ये वैभव त्रीमल (टीसीएस प्राईम -९ लाख पॅकेज),अमेय कुलकर्णी, मानसी राकले, अमृता मेटकरी (टीसीएस डिजिटल -७ लाख पॅकेज),निखिल नीळ (टीसीएस निंजा -७ लाख पॅकेज), हर्षवर्धन कोंडा, रिद्धी शेट्टी,कुणाल घोगले, रोहित खीलारी (टीसीएस निंजा -३.३६लाख पॅकेज) या विद्यार्थ्यांची निवड झाली.
सिंहगड महाविद्यालयामध्ये द्वितीय वर्षात शिकत असतानाच विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल्स व ॲप्टिट्यूड टेस्टची जोरदार तयारी करून घेतली जाते. तिसऱ्या वर्षात असताना मुलांचे मूल्यांकन केले जाते व जिथे कमतरता आहे त्यावर अधिक काम करून ती कमतरता दूर करण्याचा प्रयत्न केला जातो, विद्यार्थ्यांना प्लेसमेंट ची प्रक्रिया माहित व्हावी यासाठी नामवंत कंपन्यांचे मनुष्यबळ अधिकारी यांच्या वेबिनारचे आयोजन केले जाते, एखाद्या विशिष्ट निवड व्हायची असेल तर त्याची तयारी कशी करायची याबद्दल सविस्तर मार्गदर्शन मिळते. विद्यार्थ्यांचे ॲमकॅट व कोक्यूब या नामवंत कंपन्यांद्वारे मूल्यांकन केले जाते, त्याद्वारे विद्यार्थ्यांना कोणत्या बाबींवर भर द्यावा लागेल हे समजते. सर्व सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूरचे विद्यार्थी या प्रक्रियेतून जात असतात, त्यामुळे पदवी अंतिम वर्षात असतानाच या विद्यार्थ्यांना प्लेसमेंटद्वारे नोकरीची संधी मिळते असे सांगितले. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये सिंहगड सोलापूरच्या बाबतींत एक समाधानाचे व आनंदाचे वातावरण आहे.
या यशाबद्दल सिंहगड संस्थेचे सहसचिव तथा सिंहगड सोलापूरचे कॅम्पस डायरेक्टर श्री.संजय नवले, प्राचार्य डॉ.शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे व डॉ.शेखर जगदे,डॉ.प्रदीप तपकिरे,डॉ. विनोद खरात,डॉ. विजयकुमार बिरादार,प्रा. हरीश गुरमे,प्रा.सुरज धनवे ,ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. विकास मराठे व तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.