पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
क्रीडा व युवक संचालनालय सोलापूर यांच्यावतीने जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धा गादेगाव येथील शिवरत्न ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेमध्ये जवळपास 36 संघाने सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचे उद्घाटन गादेगाव च्या सरपंच सीमा बागल प्रसिद्ध विधीतज्ञ विजयकुमार जाधव, उपसरपंच बाबासाहेब हाके, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बागल, मनसेचे अनिल आप्पा बागल ,क्रीडा अधिकारी तानाजी मोरे, पबू दादा बागल, बाजीराव बागल, गणेश फाटे ,रमेश बागल , युवराज बागल, शांतिनाथ शिंदे,सहशिक्षक दीपक देशमुख ,नियाज मुलाणी , वर्षा मोरे,प्रशिक्षक कोच फिरोज पठाण, संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
या स्पर्धेमध्ये शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या 19 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला 19 वर्षे मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. त्याचबरोबर 17 वर्षे मुलं व 17 वर्षे मुली यांनी द्वितीय क्रमांक पटकावला या सर्व स्पर्धा अतिशय चुरशीच्या व अटीतटीच्या पार पडल्या. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून संघाने आपली नाव नोंदणी केली होती या सर्व यशस्वी स्पर्धकांचे संस्थेचे मार्गदर्शक आदरणीय शिवराज मोटेगावकर सर यांनी अभिनंदन केले यानंतर पुढील स्पर्धा पुणे विभागीय स्तरावर घेतल्या जाणार असून यासाठी शिवरत्न ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
त्याचबरोबर 19 वर्षे वयोगटातील मुलं मंगळूर अक्कलकोट या संघाने प्रथम क्रमांक पटकावला 17 वर्ष वयोगटातील मुली मंगळवेढा प्रथम क्रमांक ,सतरा वर्ष मुलं मंगळूर अक्कलकोट प्रथम क्रमांक सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.