शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त पक्ष सदस्य नोंदणी पंधरवाडा व मतदार नोंदणी सप्ताह तसेच "अस्मिता ताईची वारी... गुणवंतांच्या दारी.
" या उपक्रमाचा शुभारंभ शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या संजनाताई घाडी, शिवसेना उपनेत्या शितलताई देवरूखकर तसेच शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या शुभहस्ते शुक्रवारी सकाळी ११ वा होणार आहे .
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागले असून यानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहर सोलापूर मधील शहर उत्तर ,शहर मध्य व शहर दक्षिण या तिन्ही मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मोर्चे बांधणीला शिवसेनेच्या वतीने सुरूवात करण्यात येत आहे.यानिमीत्त अनेक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.
माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी नुकतेच भगव्या सप्ताहाचे आयोजन करण्याचे आदेश राज्यभरातील सर्व पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. याचाच भाग म्हणून शहर सोलापुरमध्ये देखील या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे शिवसेना उपनेते अस्मिता गायकवाड सांगितले आहे.
सोलापूर येथील अक्कलकोट रोड लगत ,ओंकार पार्क, शनी मंदिर जवळ कर्णिक नगर येथील कार्यालयात या उपक्रमाचे उद्घाटन शिवसेना उपनेत्या व महिला आघाडी संपर्क प्रमुख संजनाताई घाडी, उपनेत्या शितल देवरूखकर, उपनेते शरद कोळी याच्यासह , सह संपर्कप्रमुख उत्तमप्रकाश खंदारे ,लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख अजय दासरी जिल्हाप्रमुख अमर पाटील, जिल्हाप्रमुख गणेश वानकर महिला जिल्हा संघटिका प्रिया बसवंती, युती सेना जिल्हाधिकारी पूजा खंदारे,युवा सेना जिल्हाधिकारी बालाजी चौगुले, शहर प्रमुख दत्ता वानकर, संतोष केंगनाळकर,भैया धाराशिवकर, जिल्हा उप प्रमुख प्रताप चव्हाण, संतोष पाटील,दत्ता गणेशकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
सदर उपक्रमाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे ,तसेच या उपक्रमाचा लाभ 26 जुलै 2024 ते 9 ऑगस्ट 2024 पर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत नागरिकांना घेता येणार आहे.शिवाय दालनात स्थानिक समस्याची दखल देखील घेतली जाणार आहे. तरी या अभिनव उपक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवहान शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी केले आहे.