म्हसवड प्रतिनिधी तेज न्यूज
म्हसवड येथे अंगणवाडी नवगताचा प्रवेश व स्वागत सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला.
यावेळी एकात्मिक बाल विकास नागरी सातारा प्रकल्प अधिकारी ज्योती लंगुटे , सुपरवायझर रेखा घोरपडे ,विशेष प्रमुख पाहुणे म्हणून सुवर्णा पोरे व ऍड.गौरी पोरे ,सेविका अश्विनी फुटाणे मदतनीस सुनिता गोंजारी आदि मान्यवर उपस्थित होत्या.
यावेळी अंगणवाडी क्रमांक 86 कोष्ट गल्ली, म्हसवड येथे या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती सुवर्णा सुनील पोरे (भारत गॅस एजन्सी म्हसवड) अंगणवाडी प्रवेशोत्सव, नवागतांचे स्वागत करण्यात आले व सर्व नवागतांना अंगणवाडी सेविका अश्विनी अतुल फुटाणे यांच्याकडून सर्व नवागतांना चिक्की खाऊ वाटप व सुवर्ण सुनील पोरे व ऍड.गौरी पोरे यांच्या हस्ते सर्व नवागतांना बिस्किट पुडा खाऊ वाटप करण्यात आला.