दोलन करण्याचा कडक इशारा
पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयामध्ये सेवानिवृत्त झालेल्या अभियंता सुहास संत यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर घेण्यात आले होते. बोर्ड कार्यालयामध्ये नव्याने नियुक्त झालेल्या अभियंतांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांची नियुक्ती एक वर्षासाठी करण्यात आली होती.
मात्र पुन्हा त्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात येत असल्याने खडकीकर नागरिकात प्रचंड रोष व्यक्त होत आहे. सेवानिवृत्त झालेल्या संतच्या बोर्ड प्रशासनाच्या वतीने प्रचंड पैशाची उधळपट्टी करण्यात असून संत यांची पुन्हा नियुक्ती करण्यात येऊ नये अशी मागणी विधानसभा सदस्य रवींद्र धंगेकर यांनी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बोर्ड कार्यालयामध्ये सुहास संत अभियंता म्हणून काम करीत होते. संत हे मागील वर्षी जून 2023 मध्ये सेवानिवृत्त झाले होते. मात्र सेवानिवृत्त झाल्यावर देखील संत यांना पुन्हा कॉन्ट्रॅक्ट बेसिस घेतले होते संत यांना कॉन्ट्रॅक्ट वर घेताना सुरुवातीचे 6 महिने 50 हजार तर नंतरचे 6 महिने तब्बल 1 लाखाच्या मानधनावर नियुक्त केले होते. बोर्डामध्ये असलेले 2 अभियंता नवीन असल्याने त्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी संत यांना 1 वर्षाच्या कालखंडा दरम्यान नियुक्त करण्यात आले होते. मात्र संत यांची पुन्हा 1 वर्षासाठी नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सारथी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष नईम शेख यांनी सांगितले.
संत यांची नियुक्त करण्यात आल्याने ते त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे धंगेकर यांचे म्हणणे आहे. बोर्डाच्या हद्दी मध्ये अल्पसंख्यांकांच्या नागरिकांनी कोणतेही बांधकाम केल्यास संत हे आपल्या अधिकाराचा गैरवापर करून दमदाटी करतात. विशेष म्हणजे संत यांना कोणत्याही प्रकारचे अधिकार नाहीत, तसेच संत यांना कोणत्याही कागदपत्रावर सही करण्याचा देखील अधिकार नाही, आणि संत यांना मुख्य अभियंताच्या कॅबिन मध्ये देखील बसण्याचा अधिकार नसताना देखील ते त्याच कॅबिन मध्ये बसून कामकाज करतात, तसेच बिलावर सही करून नागरिक आणि प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करीत असून संत यांना पुन्हा नियुक्ती केल्यास मोठे आंदोलन करण्यात येईल असा कडक इशारा धंगेकर यांच्या सहित यांच्यासहित नव हिंदू युवा संघाचे अध्यक्ष देवेंद्र शर्मा, नईम शेख यांनी दिला आहे. दरम्यान संत याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.