सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स इंटरनॅशनल क्लब्ज् अंतर्गत डिस्ट्रिक्ट 3234 डी- १, रिजन-१, झोन-२ झोन परिचय मेळावा उत्साहात ग्रीन वुड रिसॉर्ट सोरेगाव येथे आयोजित करण्यात आला होता. सुरूवातीस ध्वजवंदन लायन रविकिरण वायचळ यांनी वाचन केले. झोन परिचय मेळावा दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
व्यासपीठावर एम. जे. एफ लायन राजेंद्र शहा (कासवा) व्दितीय उपप्रांतपाल, झोन चेअरमन लायन नंदिनी जाधव, लायन डॉ अभिजित जोशी डिस्ट्रिक्ट सचिव, एम. जे. एफ. लायन महेश नळे डिस्ट्रिक्ट खजिनदार, लायन रमेश जैन डिस्ट्रिक्ट पी .आर.ऒ. यांची उपस्थित होती. लायन नंदिनी जाधव झोन चेअरमन यांनी प्रमुख पाहुणे यांचे स्वागत, सत्कार केले. तसेच झोन परिचय मेळावा आपल्या झोन मधील अध्यक्ष, सचिव, खजिनदार, प्रथम उप्पाध्यक्ष आणि कॅबिनेट ऑफीसर यांची एकमेकांशी परिचय साठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आले आहे. तसेच झोन मधील चारही लायन्स क्लब मधील अध्यक्ष, सचिव, खजिनदार, प्रथम उप्पाध्यक्ष, कॅबिनेट ऑफीसर याचेही सत्कार करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
तसेच सर्व सन्माननीय लायन सदस्यांनी आपण वष॑ भरात क्लबच्या वतीने सेवा करणार यांची माहिती सभाग्रहाला दिली. लायन डॉ अभिजित जोशी यांनी डिस्ट्रिक्ट बद्दलची माहिती, वष॑भरात काय सेवाकार्याची माहिती देऊन शुभेच्छा दिल्या. लायन महेश नळे, लायन रमेश जैन, यानें लायन नंदिनी जाधव झोन यांचे परिचय मेळावा आयोजित केल्या बद्दल कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
तसेच उपप्रांतपाल - २ यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले. लायन्स इंटरनॅशनल अध्यक्ष नंतर क्लब अध्यक्ष यांचा मान असतो.तसेच आपल्या प्रांता बद्दल माहिती देऊन शुभेच्छा दिल्या. शेवटी झोन सचिव यांनी आभार प्रदर्शन केले. सुत्रसंचालन लायन ममता बुगडे, लायन सागर पुकाळे यांनी केले.