श्री स्वामी समर्थ देवस्थान अक्कलकोट जपत आहे आध्यात्मिक सांस्कृतिक परंपरा
अक्कलकोट प्रतिनिधी तेज न्यूज
श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या १४६ व्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित धर्मसंकीर्तन सोहळ्यात ख्यातनाम गायक श्री.अभिषेक काळे सांगली यांची अप्रतिम गायन सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी समर्पित झाली.
सुरुवातीला श्री स्वामी समर्थ देवस्थान वतीने प्रथमेश महेश इंगळे,सचिव श्री.आत्माराम घाटगे, विश्वस्त श्री महेश गोगी, व्यवस्थापक श्रीशैल गवंडी यांच्या शुभहस्ते सर्वं कलाकारांचे सत्कार करण्यात आले.त्यानंतर ओंकार पाठक यांनी प्रास्ताविक करत सांगितले की श्री स्वामी महाराजांच्या इच्छेनुसार गेली अनेक वर्षे धर्मसंकीर्तनात नामवंत कलाकारांची संगीत सेवा, कीर्तन, प्रवचन सेवा कार्यक्रम होतात.त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली.
सुरुवातीला गणेश वंदना सुर निरागस हो या गाण्याने करत कानडा राजा पंढरीचा,माझे माहेर पंढरी,भाग्यदा लक्ष्मी बारंम्मा.निघालो घेऊन दत्ताची पालखी,काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल,अशा अनेक संतरचना गाऊन स्वामी भक्तांना मंत्रमुग्ध केले शेवटी येरे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या व स्वामी समर्थ गजराने अभंगरंगाची सांगता केली.त्यांना तितकीच अप्रतिम दमदार साथसंगत हार्मोनियम ओंकार पाठक तबला विवेक पोतदार पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे टाळ अक्षय सरदेशमुख यांनी केली.यावेळी अनेक स्वामी भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.धर्मसंकीर्तनात अनेक नामवंत मंडळी स्वामींची सेवा करण्यासाठी धन्यता मानतात.आणि श्री स्वामी समर्थ देवस्थान अतिशय सुंदर आयोजन नियोजन करत हा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याची परंपरा कायम राखत आहे.