मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीचा निकाल येत्या 27 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल.
मंडळाने राज्यातील एकूण नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च 2024 मध्ये ही परीक्षा घेतली होती. दरम्यान, खाली दिलेल्या संकेतस्थळांवर इयत्ता दहावीचा निकाल पाहता येईल.