सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री.बृहन्मठ होटगी शिक्षण संस्था संचलित दक्षिण सोलापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र धोत्री येथील श्री.भगवती गौरीमाता प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 76.19% इतका लागला.फेब्रुवारी/ मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परीक्षेत सर्वप्रथम
कु. पांढरे अंजली बाबासाहेब(502) 83.67%
कु. माळी सृष्टी विजयकुमार(458) 76.33% द्वितीय .कु. मुळे स्वाती शिवानंद(458) 76.33% द्वितीय.
कु. शेख यास्मिन हुसेनी(427) 71.17% तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले
या कौतुकास्पद यशाबद्दल श्री.श्री.श्री.1008 ज्ञान सिंहासनाधीश्वर जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी,काशीमहापीठ. बृहन्मठ होटगी मठाचे मठाधिपती श्री.ष.ब्र चन्नयोगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी,संस्थेचे सचिव श्री. शांतय्या स्वामी सर ,संचालक श्री.शशिकांत रामपुरे साहेब, सर्व पदाधिकारी, शालेय समितीचे सदस्य श्री.शिवशरण बिराजदार सर,प्राचार्य श्री.नंदकुमार धाये सर,पर्यवेक्षिका सौ सुमन बिराजदार मॅडम,ज्येष्ठ प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी, प्रा.मल्लिनाथ हुलसुरे , प्रा.दत्तात्रय बिराजदार,प्रा.सचिन होटगे व पालक आणि ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदनपर कौतुक करून व पुढील शैक्षणिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिले.