पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर शहरातील कालिका देवी चौकात कॉर्नर सभा पार पडली. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. भाजपच्या सत्तेत सर्वसामान्य जनतेसह, शेतकरी हैरान झाला आहे. खते महागली आहेत. बियाने महागली आहेत. महागाईने तर कंबरडं मोडलं आहे. आता या सरकारला आपल्याला मतदानातून धडा शिकवायचा आहे. यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेसला भरभरून मतदान करा, असे आवाहन या प्रसंगी बोलताना केले. याप्रसंगी भगीरथ दादा भालके यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंढरपूर शहरातील डोंबे गल्ली येथे कॉर्नर सभा पार पडली. पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी यावेळेला काँग्रेसला निवडून द्या. तीर्थक्षेत्रासह आपले प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करेन, असे आश्वासन यावेळी बोलताना केले. या प्रसंगी भगीरथ दादा भालके यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.