सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
केगाव येथील एन.बी.नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.
तसेच यावेळी डॉ. शंकर नवले यांनी अहिल्यादेवी होळकर यांनी महिला सक्षमीकरण आणि समाज कल्याणासाठी केलेले काम याविषयी महिती सांगीतली. यावेळी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शेखर जगदे,डॉ. दत्तात्रय गंधमल, प्रा.फरीद वळसंगकर,प्रा.व्ही.व्ही.पालमुर, प्रा. पी .एस. भालेराव, प्रा.रुपाली चव्हाण,प्रा. मन्सूर अली काझी,गणेश घोगले, विद्यानंद बाबर, गौरीशंकर अतनुरे, पूनम शिंदे,आदी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.