लोकशाहीचा बाळगूया अभिमान...चला करूया मतदान
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री.समाधान (दादा) आवताडे यांनी इंग्लिश स्कूल, मंगळवेढा येथे सहकाऱ्यांना सोबत घेत आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
लोकशाही बळकटीकरणासाठी निवडणूक आणि मतदान ही अतिशय महत्वाची अंगे आहेत. त्यामुळे आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही सुद्धा न चुकता मतदानाचा हक्क मतदान करुन पूर्ण करा व गतिमान लोकशाहीच्या निर्मितीसाठी आपले योगदान द्यावे.
सध्या खुप ऊन असल्याने शक्य तितक्या लवकर जाऊन मतदान करावे, मतदान बरोबरच उन्हात स्वतः ची काळजी घ्या असे आवाहन आमदार महोदय यांनी मतदार बंधू-भगिनी जनतेला केले आहे.
मंडळी लक्षात ठेवा, मतदान हे लोकशाहीचा कणा सशक्त करणारे माध्यम आहे.