सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
केगाव येथील एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक समारंभ व प्रयोग २के२४ संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विजयकुमार उबाळे , प्राचार्य, दयानंद कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, संस्थेचे सहसचिव व सिंहगड सोलापूर चे कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय नवले, ज्येष्ठ संशोधक व माजी कुलगुरू डॉ. एस. एच. पवार, प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. एस एम जगदे, उपप्राचार्य डॉ. आर. टी. व्यवहारे व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल, जनरल सायन्स,इलेक्ट्रिकल मधील विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी बोलताना कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय नवले यांनी सर्व पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व अंतिम वर्षातील विद्यार्थी सिंहगड इन्स्टिट्यूट चे नाव उंचीवर नेतील असा विश्वास व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी अंतिम वर्षातील बेस्ट आउटगोईंग स्टुडंट अवॉर्ड, नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी विक्रम अवॉर्ड, अर्जुन अवॉर्ड प्रयोग व युजी- कॉन अशा विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले.यावेळी प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जीवनात शिकलेल्या मूल्यांची जाणीव सतत ठेवावी असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पुरस्कारांचे वाचन गौरी जिंदे व श्रावणी नवले,या विद्यार्थिनींनी केले. आभारप्रदर्शन डॉ . सुवर्णा क्षिरसागर केले. यांनी विद्यार्थ्यांना केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. सुनीता सगट, विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिष्ठाता डॉ. सुवर्णा क्षीरसागर, प्रा. रवींद्र देशमुख, प्रा. सुमेध पाठक ,प्रा. आयेशा अलीम, डॉ. भावना श्रीवास्तव यांनी परिश्रम घेतले.
कॉम्प्युटर सायन्स ची ऋतुजा राऊत ठरली बेस्ट
बेस्ट आऊट गोइंग स्टुडंट साठी प्रचंड चुरस दिसून आली. यामध्ये कॉम्प्युटर सायन्स ची विद्यार्थिनी ऋतुजा राऊत, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट मधून अभिषेक लोमटे, इले्ट्रॉनिक्स मधून धनश्री तळेकर, सिव्हिल मधून ओंकार बिराजदार व निखिल नीळ व लक्ष्मीपुत्र बिराजदार यांना सर्वात जास्त उपस्थिती बद्दल तर माधुरी नाईकनवरे ,सुनीता चव्हाण,लक्ष्मीपुत्र बिराजदार,सानिया हकीम यांना बेस्ट इंटर्नशिप या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.