पंतप्रधान मोदीजींच्या समर्थनात सोलापूरकरांचा जनसागर उफाळला...
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर लोकसभा भाजपा उमेदवार राम सातपुते व माढा लोकसभा भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर जी यांच्या प्रचारार्थ भाजपा विजय संकल्प रॅलीमध्ये (नामांकन रॅली) उपस्थित जनसागरला संबोधित केले.
रणजितसिंह नाईक-निंबाळकर जी यांनी खासदार असताना पाणी, रेल्वे आणि रस्त्यांच्या कामांचा पाठपुरावा केला आणि कामे जनतेपर्यंत पोहोचवली. राम सातपुते यांचे नेतृत्व गरिबीशी लढा देऊन उभारलेले नेतृत्व आहे. यांनी पैसे नाही जनतेचे प्रेम कमवले आहे. जनसामान्यांची सेवा करण्यासाठी हे दोन्ही नेते आज मैदानात आहेत. यांना दिलेले मत म्हणजे मा. मोदीजी यांना दिलेले मत आहे. कारण ही निवडणूक उमेदवारांची नाही, ही निवडणूक मा. मोदीजी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे, भारताचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. विश्वगौरव, विकासपुरुष मा. मोदीजी यांच्या नेतृत्वाला समर्थनरूपी आशीर्वाद देण्यासाठी जनता राम सातपुते व रणजितसिंह नाईक-निंबाळकर जी यांना बहुमताने विजयी करेल हा विश्वास आहे.
यावेळी जय सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी, आ. सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख, आ. बबनदादा शिंदे, आ. जयकुमार गोरे. आ. सचिनजी कल्याणशेट्टी, आ. संजयमामा शिंदे, आ. समाधान अवताडे, आ. यशवंत माने, आ. शहाजीबापू पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.