पंढरपूर प्रतिनिधी
गादेगाव (ता. पंढरपूर) येथील ज्येष्ठ नागरिक मारुती (दादा) शिंदे यांचे वृद्धपकाळाने वयाच्या 102 व्या वर्षी गुरुवार दि. 18 एप्रिल रोजी पहाटे 5:45 ला निधन झाले. त्यांच्यावर सकाळी 10.30 वाजता गादेगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांचा तिसरा दिवस शनिवार दि. 20 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता गादेगाव येथील स्मशानभूमीत होणार आहे. त्यांच्या पश्चात अशोक शिंदे, नवनाथ शिंदे, शिवाजी शिंदे ही 3 मुले, सुना, नातवंडे, परतवंड असा मोठा परिवार आहे. दै. पंढरी भूषणचे संपादक तथा हमाल मापाडी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांचे ते वडील होते. त्यांच्या निधनामुळे गादेगाव पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे.