पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील नांदोरे येथे माढा लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ माजी पंचायत समिती सभापती सौ.वैष्णवीदेवी अर्जुनसिह मोहिते पाटील यांनी गाव भेट दौरा करत जनसंवाद साधला तसेच तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून धैर्यशिल भैय्यांना विजय करण्याचे आवाहन केले.
या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाध्यक्ष संभाजी राजे शिंदे, दिपक दादा पवार तालुका प्रमुख बंडू घोडके, सरपंच सत्यवान माने, सोसायटी चेअरमन शिवाजी साळुंखे,माजी सरपंच मारुती भिगारे, माजी उपसभापती प्रतापराव (आबा ) पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर, सुनंदाताई फुले, विजय दादा भोसले, माजी सरपंच सुरेश पाटील, राजेंद्र भोसले, विजय भिगारे, अजिनाथ भिगारे, युवराज भिगारे, रवि भिगारे,विलास साळुंखे, प्रशांत चव्हाण, विलास सातुरे,सचिन पुजारी, विठ्ठल भिगारे व इतर मान्यवर उपस्थित होते.