सोलापूर प्रतिनिधी
केगांव येथील एन. बी. नवले सिंहगड महाविद्यालयात 'आयएसटीई ' विद्यार्थी विभागाचे उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी आयएसटीई राष्ट्रीय मंडळ नवी दिल्ली चे सदस्य डॉ. नरेंद्र काटीकर यांचे समाजसेवेतून व्यक्तिमत्व विकास या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये आयएसटीई च्या विविध उपक्रमांचे महत्व स्पष्ट केले.
याप्रसंगी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. शंकर नवले यांनी आयएसटीई विद्यार्थी समितीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. आदित्य बनसोडे-अध्यक्ष, श्रीयश आडम -उपाध्यक्ष, नम्रता पवार - सचिव तसेच अन्य पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. कौस्तुभ मंगरूळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.प्रा. अमृता रुईकर आणि प्रा. मोहिनी नवले तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.