पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर येथील ॲड. प्रशांत विनायक चंदनशिवे यांची भारत सरकारद्वारे नोटरी पब्लिकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भारत सरकार कायदा व न्याय मंत्रालय यांचे मार्फत सन 2021 पासून विविध टप्प्यात राबविण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याने महाराष्ट्र राज्यात ही नियुक्ती करण्यात आली आहे. प्रतिकूल परिस्थितीत व खडतर जीवन प्रवासात बी.ए., बी.पी.एड., एल.एल.बी. (Spl.) असे उच्च शिक्षण घेऊन वकीली व्यवसाय सांभाळत अशा प्रकारचे यश संपादन करणे हे नक्कीच कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे.
त्यांनी पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालय, तसेच मंगळवेढा, सांगोला, मोहोळ व आटपाडी येथे तब्बल पंधरा वर्षे वकील म्हणून कामकाज पाहताना त्यांनी दिवाणी, फौजदारी, कौटुंबिक व महसूल न्यायालयांमधील अनेक प्रकरणे व केसेसमध्ये उत्तमरित्या काम करुन पक्षकारांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल पंढरपूर बार असोसिएशन व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यवसायिक अशा सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.