वेळापूर प्रतिनिधी
आज रविवार दिनांक-17.03.2024 रोजी सकाळी 9 वाजता विरशैव लिंगायत समाज अकलूज यांच्या मार्गदर्शनाने शिवशक्ति वीरशैव लिंगायत सामाजिक उद्देशिय संस्था अकलूज यांच्या वतीने विरशैव लिंगायत समाज बांधवांसाठी वेळापूर येथे विरशैव लिंगायत पाठशाळा या नवीन उपक्रमाचा शुभारंभ कार्यक्रम श्री.108 सद्गुरू सदाशिव शिवाचार्य महास्वामीजी वेळापूरकर यांच्या दिव्य सानिध्यात संपन्न झाला.त्यानंतर सदाशिव शिवाचार्य महास्वामीजी यांनी उपस्थितीत शिवभक्तांना धर्म उपदेश केला.
विरशैव लिंगायत पाठशाळेमध्ये " ओम नम: शिवाय" या षड़ाक्षरी मंत्राचे सामुहिक पठण , विरशैव लिंगायत समाज्याच्या विविध ग्रंथ महाम्याच्या सबंधित विषयांवर मार्गदर्शन शिबिर व उत्कृष्ट ग्रंथवाचन स्पर्धा , विरशैव लिंगायत समाज्याच्या सबंधित ऐतिहासिक विषयांवर प्रश्नमंजूषा असे उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.सदरचा कार्यक्रम हा आठवडय़ाच्या प्रत्येक रविवारी महादेव मंदिर बसवेश्वर पथ अकलूज येथे सकाळी 8 ते 10 या वेळेत आयोजित केला जाणार आहे.सदरच्या पाठशाळेमध्ये वैभव स्वामी वेळापूर हे धार्मिक शिक्षण दिले जाणार आहे.
त्यामुळे आपल्या समाज्यातील मुला-मुलींचे लिंगायत धर्माविषयी प्रबोधन होईल आणि आध्यात्मिक ज्ञान वाढून मुलांना आपल्या धर्माविषयी आवड निमार्ण होईल या उद्देशाने हा उपक्रम आयोजित केला असून सर्व समाजबांधवांनी आपल्या कुटुंबातील मुला-मुलींना सोबत घेवून वरील कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन शिवशक्ति संस्थेचे अध्यक्ष महेश डिकोळे यांनी केले आहे.
यावेळी वीरभद्र स्वामी, राम जठार,ओम राजमाने,समर्थ गुळवे,शौर्य गुळवे,राजवीर नरुळे,समर्थ नरुळे,शिवम बागल,आदित्य बागल, वेदांत नडगिरे,आयुष शेटे,रुद्र दिवटे, प्राती जठार,श्रेया गुळवे, प्रगति गोडसे,सोनिया गुळवे,स्वराली गुळवे,अनुष्का लांडगे,वैभवी गुळवे,आकांक्षा गुळवे,श्रेया शेटे,विश्वश्री नरुळे,सई दिवटे या मुला-मुलींनी सहभाग नोंदवला.
यावेळी विरशैव लिंगायत विरशैव लिंगायत समाज्याचे अध्यक्ष-विलास क्षीरसागर,उपाध्यक्ष-संतोष देवशेटे,विरशैव लिंगायत समाज्यातील जेष्ठ चंद्रकांत शेटे, सतेज दिवटे (आप्पा),नितीन आर्वे (आण्णा),विठ्ठल बागल, पोपट शेटे,कोरेकाका व समाजबांधव अतुल शेटे,उदय शेटे,भीमाशंकर वैद्य-देशमुख,गिरीष शेटे,महादेव पाटील,नागेश लिगाडे,प्रफुल्ल आंधळकर,महालिंग राऊत,उमेश नडगिरे,सोमनाथ बिराजदार,ओंकार बेलपत्रे, महात्मा बसवेश्वर सामाजिक संस्थेचे-सचिन गुळवे,शिवकुमार गुळवे,योगेश गुळवे,आदित्य आर्वे,गणेश नरुळे,सनेश नरुळे,संदीप कुंभार,सोमनाथ कथले तसेच शिवकुमार सपलगी,वैभव डिकोळे,जगदिश स्वामी,निसर्ग स्वामी,महिला मंडळ अकलूज माजी अध्यक्षा-प्रज्ञा जठार, उमा-शंकर रुद्र मंडळाच्या विजयालक्ष्मी गुळवे आणि मुले-मुली बहूसंख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष-महेश डिकोळे,सचिव-ऋषिकेश कानडे,सदस्य-काशिनाथ उरवणे,सदस्य-प्राची डिकोळे यांनी विशेष श्रम घेतले.