स्त्रीला समान हक्क आणि सन्मान मिळाला तरच जागतिक महिला दिन सार्थक- पत्रकार आनंदा थोरात
कराड प्रतिनिधी
कायद्याने स्त्रीला अधिकार आणि सन्मान दिला आहे परंतु वास्तविक खरोखरच स्त्रीला हक्क आणि सन्मान मिळतो का याचे मंथन होणे गरजेचे आहे. आणि स्त्रीला समान हक्क आणि समान सन्मान मिळेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन सार्थक असे मत ज्ञानदीप सामाजिक आणि शैक्षणिक विकास संस्थेचे अध्यक्ष पत्रकार आनंदा थोरात यांनी व्यक्त केले.
पाडळी केसे तालुका कराड येथील आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा कराड येथील शासकीय विश्रामगृहात सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीर पत्नी सुप्रिया सोनटक्के होत्या. यावेळी आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते, वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हा महासचिव शरद गाडे, दैनिक लोकमतचे पत्रकार युवराज मोहिते, एडवोकेट माधवी पवार, राष्ट्रीय काँग्रेसचे ओबीसी विभागाचे कराड तालुका अध्यक्ष सागर जाधव, समता मुलक समाज निर्मिती संस्थेचे अरुण वाघमारे,जावेद सुतार, राष्ट्रीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे कराड तालुका उपाध्यक्ष विजय वायदंडे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप महाजन,विजय व्होवाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम दरम्यान प्रमिला भोसले, शबाना सुतार, वैशाली देवकर, सुरेखा शिंदे, रूपाली शिंदे यांच्यासह असंख्य महिलांचा सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तर यावेळी पश्चिम सुपने येथील शिवाजीराव गायकवाड यांना *आदर्श राज्यस्तरीय समाजसेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर राष्ट्रीय काँग्रेस भटक्या जाती जमाती सातारा जिल्हा अध्यक्षपदी शेरे गावचे आनंदराव जाधव यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.*
यावेळी आनंदा थोरात म्हणाले, भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला हक्क आणि अधिकार दिलेले आहेत. प्रत्येक जण हक्क आणि अधिकार याच्या अपेक्षा न राहतो परंतु हक्क आणि अधिकाराची अपेक्षा सदैव करीत असतो त्याचवेळी जबाबदार नागरिकांनी कर्तव्याची जाण ही ठेवली पाहिजे, तरच आपण संविधानाच्या देशात राहतो याचा सार्थ अभिमान सांगायला हरकत नाही असे सांगून आनंदा थोरात म्हणाले, केवळ वर्षातील कॅलेंडर प्रमाणे वेगवेगळे दिन साजरे करून चालणार नाही तर त्या दिनाचे महत्त्व सांगून त्या दिनाबद्दल खरंच ज्या ठिकाणी प्रबोधनाची गरज आहे त्या ठिकाणी सुज्ञ नागरिक म्हणून प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. आज जागतिक महिला दिन साजरा करत असताना संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकाराचा भाषणातून आणि कायद्यातून सांगितला जातो मात्र मूलभूत अधिकाराचा हनन होत असेल त्या ठिकाणी मात्र दालचाल कोणीही पुढे येताना दिसत नाही. खरी खंत व्यक्त करून महिलांना समान हक्क आणि समान सन्मान मिळवून देण्यासाठी सामाजिक संस्थापक्ष आणि संघटना आणि पुढाकार घेण्याची अपेक्षा यावेळी थोरात यांनी व्यक्त केली. यावेळी शरद गाडे, सुरेखा शिंदे, सुप्रिया सोनटक्के, युवराज मोहिते, सागर जाधव आदींनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी प्रास्ताविक करताना संस्थेचे अध्यक्ष विश्वास मोहिते म्हणाले, संस्थेने आज पर्यंत दिनदलित, पददलित, निराधार, अपंग, विधवा,परितक्त्या आणि वंचित घटकांसाठी सदैव पुढाकार घेऊन काम केले आहे. गुणवंतांचा सत्कार आणि त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकण्याचे काम सदैव संस्था करत राहते.
स्वागत विजया माने यांनी केले, आभार राहुल पवार यांनी मांनले. यावेळी विजय वायदंडे, युवराज कांबळे, संपत देवकर, प्रकाश कांबळे शेकडो महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते.