सोलापूर प्रतिनिधी
लायन इंटरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब ऑफ सोलापूर ट्विन सिटी व भावसार व्हिजन सोलापूर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन व लायन्स माझी आंतरराष्ट्रीय संचालिका लायन डॉ. अरुणाजी ओसवाल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी अध्यक्ष लायन इंजि. सागर पुकाळे यांच्या वतीने अभिनव वस्त्र कला निकेतन या इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थ्यांनीची पिण्याची पाण्याची सोय व्हावी म्हणून उपप्रांतपाल लायन Adv. एम के पाटील यांच्या हस्ते व भावसार सोलापूर सेंट्रल अध्यक्ष लक्ष्मीकांत मुसळे व लायन्स क्लब सोलापूर रॉयल अध्यक्षा लायन डॉ. गोमती ठेंगील यांच्या प्रमुख उपस्थितीत पिण्याच्या पाण्याची टाकी प्रदान करण्यात आली आणि फॅशन डिझायनिंग कोर्स शिकण्यासाठी आथिर्क परिस्थिती बिकट असणाऱ्या 5 महिलांना दत्तक घेण्यात आले.
यावेळी अभिनव वस्त्र कला निकेतन या संस्थेच्या संचालिका सौ. कविता साळुंखे यांनी आपल्या संस्थेबद्दल सर्वांना थोडक्यात माहिती दिली त्यानंतर आपल्या अध्यक्ष भाषणात बोलताना उपप्रांतपाल एम के पाटील यांनी उपस्थित सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या व माजी अध्यक्ष लायन सागर पुकाळे यांनी गेल्या वर्षा पासून लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी च्या माध्यमातून महिला दिन व माजी आंतरराष्ट्रीय संचालिका अरुणा जी ओसवाल यांच्या वाढदिवसानिमित्त घेत असलेल्या अरुणोदय महिला सप्ताह मध्ये घेतले जाणारे विविध उपक्रम हे महिलांसाठी अत्यंत उपयोगी असतात व त्या उपक्रमांचा महिलांना मोठ्या प्रमाणात फायदा होतोय असे म्हणत महिलांसाठी हा उपक्रम चालू केल्याबद्दल सागर पुकाळे यांच्या कार्याचा गौरव केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर विविध यश संपादित केलेल्या महिलांचा सत्कार उपप्रांतपाल एम के पाटील अध्यक्ष डॉ. गोमती ठेंगील व लक्ष्मीकांत मुसळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सचिव माधवराव वळसे, गणेश दंतकाळे वनमाला निलावर कोषाध्यक्ष प्रभाकर जवळकर नागेश बुगडे रत्नाकर निलावर गणेश खेरोडकर यांच्यासह संस्थेच्या पदाधिकारी व महिला विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश कोरवार यांनी तर आभार प्रदर्शन सागर पुकाळे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता नितीन साळुंखे व राजेश परसगोंड यांनी अधिक परिश्रम घेतले.