सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर येथील सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. चंद्रकांत नाईकवाडे यांची नुकतीच भारत सरकार नोटरी म्हणून निवड झाली आहे.
ॲड. चंद्रकांत नाईकवाडे हे सध्या ते बार्शी येथील न्यायालयात विशेष सहा. सरकारी वकील म्हणून कार्यरत आहेत .
त्यांचे शालेय शिक्षण हे दक्षिण सोलापूर येथील मंद्रूप या गावी झाले असून BSL LLB ही विधी पदवी दयानंद विधी महाविद्यालय सोलापूर , तर LLM ही पदवी मुंबई विद्यापीठातून मिळवली आहे.
यानंतर त्यांनी दयानंद विधी महाविद्यालय येथे पाच वर्ष प्राध्यापक म्हणून ज्ञानदानाची उत्कृष्ट सेवा केलेली आहे.
त्यांना विधी क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा व परिश्रमाचा फायदा झाला आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात खाजगी वकील म्हणून दिवाणी व फौजदारी क्षेत्रातही काम केले आहे. सोलापूर बार असोसिएशनचे ते विद्यमान सदस्यही आहेत. तसेच विधि क्षेत्रात गेली सोळा वर्षापासून कार्यरत आहे . श्री अमोघसिद्ध नाईकवाडे यांचे ते सुपुत्र आहेत त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे ॲड चंद्रकांत नाईकवाडे यांची नोटरी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सोलापूर वकील संघटना, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, विधी क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.