सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर येथील जिल्हा सत्र व न्यायालयात विशेष सहा. सरकारी वकील म्हणून कार्यरत असलेले सोलापूर वकील संघाच्या माजी सहसचिवा व विद्यमान सदस्य असलेल्या ,ॲड. वैशाली बंमणा बनसोडे यांची भारत सरकार नोटरी म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे
सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथे सुरुवातीच्या काळात त्यांनी खाजगी वकील म्हणून काम केले आहे. विधि क्षेत्रामध्ये गेली 12 वर्षापासून कार्यरत आहेत.
ॲड. वैशाली बनसोडे ह्या सोलापूर जिल्हा बार असोसिएशनच्या सहसचिवा म्हणूनही त्यांनी उत्कृष्टपणे कामगिरी बजावली आहे. बंमणा निंगप्पा बनसोडे यांच्या त्या कन्या आहेत त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे
त्यांची भारत सरकार नोटरी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सोलापूर वकील संघटना, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, विधी क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.