मुंबई प्रतिनिधी
मुकेशजी सारवान यांनी बाळासाहेब भवन मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
शिवसेना मुख्यालय,"बाळासाहेब भवन" मुंबई येथे शिवसेना मुख्य नेते,एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे आदेशानुसार शिवसेना राज्य समन्वयक,मुकेश सारवान प्र.अध्यक्ष राज्य मंत्री दर्जा, महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग मुंबई यांच्या अध्यक्षतेत आणि शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या उपस्थितीत शिवसेना प्रणित - मेहतर, रूखी, वाल्मिकी (स्वतंत्र) विभागाचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला.
शिवसेना प्रणित मेहतर, रूखी, वाल्मिकी (स्वतंत्र) विभागास संपूर्ण महाराष्ट्रातून वाढता पाठिंबा मिळत आहे.राज्यातील मेहतर, रूखी, वाल्मिकी समाजातील दिग्गज नेते, पदाधिकारी यांचा कार्यकर्त्यासह जाहीर प्रवेश केला आहे.
समाजरत्न सुरेश तामोत (पश्चिम महाराष्ट्र) यांच्यासह चेतन सनकत (नगरसेवक जळगांव महानगरपालिका) प्रितम ढंढोरे (नगरसेवक नंदुरबार नगरपालिका) युवा नेते नितीनभाई सारवान (नाशिक) पुरुषोत्तम चव्हाण नगरसेवक - कल्याण, डोंबिवली, महानगरपालिका) कोकण विभाग.सुमित रिडलान,जितेंद्र सौदा (मराठवाडा) राजेश सारवान, नितेश कल्याणे (विदर्भ) भगवान ससाणे (मुंबई)यांनाही मिळणार राज्य कार्यकारणीत मानाचे स्थान देण्यात आले आहे.
शिवसेना मुख्यालय,"बाळासाहेब भवन" मुंबई येथे राज्यसमन्वयक मा. मुकेश सारवान यांचे अध्यक्षतेत आणि शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या पदग्रहण सोहळ्यात विलास लक्ष्मण बोराडे शिवसेना सोशल मीडिया प्रमुख तथा राष्ट्रीय निमंत्रक अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघ, मिलिंद सतीश पवार रुखि समाजाचे नेते विनोद भाना चव्हाण,अशोक सोलंकी (कल्याण डोंबिवली) दिनेश भाई सोंडा चव्हाण,धीरज भाई बेरडीया (भिवंडी) रतनबेन धीरज गोहिल वंदनाबेन रमेश गणणारा (रुखी समाज महिला नेत्या ठाणे), ठाणे जिल्हा मेहतर समाज प्रमुख नेते प्रभाकर घेंगट (कल्याण) उमेश सरपटे (ठाणे) रूपचंद पवार (उल्हासनगर) वाल्मिकी समाजाचे युवा नेते, अनिल तेजी (उल्हासनगर) आकाश टाक (अंबरनाथ) भगवान ससाणे (मुंबई) विलासराव सोळंकी (रुखि चरोत्तर समाज अध्यक्ष - रोहा जिल्हा रायगड) रितेश बहारे, अमित रमेश चव्हाण, जयेश भाई (नाशिक)यांचेसह पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव तसेच भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.