शेळवे प्रतिनिधी
शेळवे येथील उपक्रमशील प्रशाला सनराईज पब्लिक स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचा पहिला दिवस व माता भगिनी सन्मान सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला,सनराईज फेस्टिव्हल च्या पहिल्या दिवशी आज प्रशालेत शेळवे पंचक्रोशीतील कर्तृत्वान महिलांचा सन्मान श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या मातोश्री जयश्रीताई धनंजय पाटील यांच्या शुभहस्ते आ.शहाजी पाटील यांच्या सुनबाई,सौ.अपेक्षा दिग्विजय पाटील,मुख्याध्यापिका,सौ.शांता वाघमोडे,उपक्रमशील शिक्षिका कल्पना घाडगे,पंढरपूर पोलिस च्या कर्तव्यदक्ष अधिकारी सौ.सविता थोरात यांच्या उपस्थितीत करण्यात आला,परिसरातील कर्तृत्वान महिलांमध्ये शेळवे गावच्या सीमा सुरक्षाबलाच्या अधिकारी सौ.दिपाली शुभम गाजरे, शेळवे गावच्या सरपंच सुनीता अनिल गाजरे,देवडे गावच्या आदर्श व उपक्रमशील सरपंच प्रमिला सोमनाथ झांबरे, पट कुरोली च्या सरपंच नंदा विष्णू मोरे,आजोती च्या सरपंच आरती अभिजित पवार, भंडी शेगाव च्या सरपंच मनिषा यलमर, वाडी कुरोलीच्या सरपंच लाडाबाई काळे,शेवते गावच्या उपसरपंच वैशाली उलभगत,होळे गावच्या सरपंच सुवर्णा युवराज भुसणर ई.कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साप्ताहिक दिपज्योति व दै.पंढरी भूषण चे संपादक शिवाजी शिंदे हे होते तर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद बँकेचे मॅनेजर पि आर माने,पाठबंधारे अधिकारी सोमनाथ देशमुख,सामाजिक कार्यकर्ते ऍड.विजयकुमार नागटिळक,विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक रमेश चिखलकर,उपक्रमशील शिक्षक, दत्तात्रय फाळके, ग्रामपंचायत सदस्य युवा नेते संतोष शिंदे, युवा उद्योजक दत्तात्रय खपाले,उद्योजक तानाजी सालविठ्ठल,गुरसाळे गावचे सरपंच दिपक शिंदे, उपरी गावचे सरपंच निवास नागणे, पिराची कुरोली गावचे सरपंच रणजित लामकाने,सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र फुगारे,प्रगतशील बागायतदार जाकीर मुलाणी इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी आपल्या मनोगतातून ग्रामिण भागात अतिशय कष्ठातून उत्कृष्ट आणि दर्जेदार शिक्षण देणाऱ्या सनराईज पब्लिक स्कूल चे कौतुक केले, तसेच शिक्षणाबरोबर विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांचे अभिनंदन केले.
पंढरपूर च्या कर्तव्यदक्ष महिला पोलिस अधिकारी यांनी आपल्या मनोगतातून विध्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कला, क्रीडा तसेच सांस्कृतिक स्पर्धात मिळवलेल्या यशाचे कौतुक केले व शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी शुभेच्छा दिल्या.
आपल्या मुलांमध्ये असलेल्या सुप्त कला गुणांना व कलाविष्कार पाहण्यासाठी पालक परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता,विध्यार्थ्यांनी अतिशय सुरेख व उत्तम कलाकृती सादर करून सर्व प्रेक्षक वर्गाची मने जिंकली...
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाधान गाजरे यांनी केले तर,सूत्रसंचालन अंकुश गाजरे यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजित लोकरे यांनी कष्ट घेतले तर प्रशालेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.