पंढरपूर प्रतिनिधी
उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय आय.क्यु.ए.सी. व महिला सक्षमीकरण विभाग व श्रीमती श्रध्दा श्रीकांत बंडेवार यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिना निमित्त ५ मार्च रोजी उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे लेखिका सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा.आ. प्रशांत परिचारक संस्थेचे कार्यवाह मा. प्राचार्य डॉ. मिलिंद परिचारक तसेच संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्री सुर्यकांत पारखे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच या कार्यक्रमास प्रमुख अध्यक्ष म्हणून मा. सौ. मीरा परिचारक सौ. अमृता परिचारक पंढरपुरातील व्यवसायिक श्री संतोष बंडेवार महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. विद्युलता पांढरे उपस्थित होते. या कार्यक्रमात श्रीमतो वंदना कुलकर्णी, श्रीमती आशा पाटील, श्रीमती उज्ज्वला शिंदे, श्रीमती प्रिया कोलवार, प्राचार्य डॉ. विद्युलता पांढरे, प्रा. सविता दूधभाते यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात सौ. मोरा परिचारक यांनी आजची महिला व तीचे कर्तृत्त्व या विषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. विद्युलता पांढरे यांनी केले सूत्र संचालन प्रा. सविता दूधभाते यांनी तर प्रा. वैद्य मुक्ता यांनी आभार मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. तसेच प्रा. डॉ. विलास बंडगर, प्रा. जाकीर बागवान, प्रा. रोहित खिस्ते, श्री विजय वाघमारे, श्री दत्तात्रय घाडगे, श्री त्रिगुण लोखंडे, श्री अख्तर पटवेकरी, श्री सागर येडगे यांनी परिश्रम घेतले.