वाशीम प्रतिनिधी
स्वराज्य पक्ष प्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांचा नुकताच वाशीम जिल्हा येथे दौरा झाला. या वेळी विदर्भातील मुद्यावर चर्चा तसेच त विदर्भातील पदाधिकारी यांच्याशी संवाद व पक्ष वाढ करण्या संधर्भात एकमत झाले. याचाच भाग म्हणून विदर्भ मध्ये नवीन नियोजन करून तरुणांना संधी देण्याकरिता नियुक्ती जाहिर करण्यात आल्या. त्यामध्ये वर्धा जिल्हाध्यक्ष (शेतकरी आघाडी ) म्हणून श्रीकांत भांडवलकर यांची नियुक्ती करण्यात आली.
या प्रसंगाच्या वेळी बोलताना पक्ष वाढी करिता आपण तन मन धनाने कार्य करू अशी ग्वाही नवनियुक्त जिल्हाध्यक्ष श्रीकांत भांडवलकर यांनी दिली तसेच छत्रपती संभाजी महाराज, अंकुश बाबा कदम, डॉ.धनंजयदादा जाधव भुजंग काळे सदानंद दादा यांचे आभार मानले
त्यांच्या नियुक्ती बद्द्ल स्वराज्य पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते,तसेच अनेक गणमान्य व्यक्तींनी स्वागत केले आहे.