मुंबई प्रतिनिधी
आता 2023-24 या आर्थिक वर्षाचे अखेरचे दोन दिवस राहिले आहेत. 2024-25 हे नवं आर्थिक वर्ष एक एप्रिलपासून सुरू होत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने एप्रिल महिन्यातल्या बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्याविषयीची माहिती घेऊ या. दर महिन्याप्रमाणेच या महिन्यातही बँकेला काही सुट्ट्या आहेत.
आरबीआयच्या ऑफिशियल वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार एप्रिलमध्ये बँकांना तब्बल 14 दिवस सुट्ट्या आहेत. आरबीआयने राष्ट्रीय पातळीवरची बँक हॉलिडे लिस्ट प्रसिद्ध केली आहे. या सुट्ट्यांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये असलेल्या सणांच्या सुट्ट्यांसह शनिवार, रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे.