भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील चौगुलेवाडी येथे शिवजयंती निमित्त लहान गटातील वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भगवानराव चौगुले हे होते. तर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून एलआयसी चे विकास अधिकारी रणजीत जगताप व एलआयसी चे विकास अधिकारी बजरंग चौगुले हे होते.
यावेळी हभप रामदास महाराज चौगुले,शिक्षक सुनील गवळी,विमा प्रतिनिधि प्रशांत माळवदे,डॉ.चौगुले, आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रणजीत जगताप म्हणाले की, लहान मुलांच्या वरच बालवयातच योग्य ते संस्कार झाले पाहिजे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोहोचला पाहिजे. तरच भावी पिढी एक आदर्श निर्माण करू शकेल.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल चौगुले यांनी केले तर सूत्रसंचालन ह भ प रुपेश महाराज चौगुले यांनी केले. तर आभार हरिदास चौगुले यांनी मानले. यावेळी विद्यार्थ्यांना वही पेन केळी बिस्किट यांचे वाटप करण्यात आले.यावेळी परिसरातील विद्यार्थी पालक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.