भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील आनंद काका देशपांडे यांच्या निवासस्थानी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या 179 व्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अरुणोदय सेवा न्यासचे प्रमुख, सेवानिवृत्त शिक्षक कल्याण कलढोणे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.यावेळी महिलांनी भजनाचा कार्यक्रम पार पाडला.
यावेळी नूतन सरपंच रणजित जाधव यांचा फेटा,हार,शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्राम. सदस्य नितीन शिंदे, डॉ.धनंजय गाजरे,राजाभाऊ शिंदे, अक्षय म्हेत्रे,दामाजी देशपांडे,सदाशिव वाघमारे,बाळू कारंडे,बाळू कलढोणे, बंडू हिंगमिरे ,राजेंद्र आंबेकर व महिला उपस्थित होत्या. आरतीच्या कार्यक्रमानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.