तरंगिणी प्रतिष्ठान पुणे आणि नादब्रह्म कला फाउंडेशनचा पुढाकार
आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ख्यातनाम कलाकारांची उपस्थिती लाभणार
पंढरपूर प्रतिनिधी
श्री क्षेत्र पंढरपूर येथे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असलेल्या "तरंगिणी"सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे."नादब्रह्म" कला फाउंडेशन करकंब आणि मनमाडकर परिवार यांच्या अथक परिश्रमातून शनिवार रविवार दिनांक २-३ मार्च रोजी सायंकाळी ५:३०वा.आरती प्रांगण भक्ती मार्ग पंढरपूर येथे भव्यदिव्य पद्मश्री पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी सांगितले.
शनिवार दिनांक सायंकाळी ५:३० वा.आदरणीय मा.आमदार प्रशांत मालक परिचारक, ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, व पं.शौनक अभिषेकी,पं.वसंतराव मराठे,यांच्या शुभहस्ते शुभारंभ होणार असून आईवडील कै.पुष्पा व कै.नारायण दुधाणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संगीत सेवा सन्मान पुरस्कार पंढरपूर मधील गायक दिलीप टोमके यांना दिला जाणार असून प्रथम सत्रात ख्यातनाम गायिका कल्याणी जोशी आणि द्वितीय सत्रात ख्यातनाम गायक पं.हेमंत पेंडसे यांचे गायन सादर होणार असून त्यांना साथसंगत तबला अभिजित बारटक्के, हार्मोनियम सुरेश फडतरे, पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे टाळ वैभव केंगार करणार आहेत.
तसेच दुसऱ्या दिवशी रविवारी सायंकाळी ५:०० वा पद्मश्री पं.जितेंद्र अभिषेकी यांचे नातू पं.शौनक अभिषेकी यांचे सुपुत्र आणि शिष्य अभेद अभिषेकी यांच्या गायनाने सुरुवात होणार असून द्वितीय सत्रात पं.तौफिक कुरेशी यांचे सुपुत्र आणि शिष्य शिखरनाद कुरेशी यांचे सुश्राव्य जेंबेवादन सादर होणार असून पंढरपूरकरांना नवीनच असलेल्या या वाद्यांचा आगळावेगळा अनुभव मिळणार आहे.त्यांना तबला साथ गीत इनामदार तर हार्मोनियम साथ अमेय बिच्चू करणार आहेत.
या २ दिवस चालणारा संगीत महोत्सव विनामूल्य असून हे या महोत्सवाचे २ रे वर्ष आहे.हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी तरंगिणी प्रतिष्ठान चे शौनक अभिषेकी, नादब्रह्म कला फाउंडेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दुधाणे, भगवानभाऊ मनमाडकर, शुभांगीताई मनमाडकर, धनंजय मनमाडकर, महिला संगीत भिसी च्या सर्व महिला भगिनी माधूरीताई जोशी, डॉ.प्रसाद कुलकर्णी, डॉ.मिलिंद जोशी, संकेत कुलकर्णी,वैभव केंगार,गौरी अंमळनेरकर,माऊली खरात, राजेश खिस्ते,सुदर्शन कुंभार,शरद जाधव,राम अनवते,शिवराज पंडीत आदीजण प्रयत्न करीत आहेत.