भाळवणी प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित शिव सप्ताह अंतर्गत प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांच्या संकल्पनेतून शिवजयंती निमित्त जागर शिव विचारांचा व्याख्यानमाला आज वसंतराव काळे विद्यामंदिर चंद्रभागा नगर भाळवणी या प्रशालेमध्ये शिवव्याख्याते शिवाजी कोलगे यांचे व्याख्यान संपन्न झाले.
यावेळी बोलताना शिवाजी कॉलेगे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले छोटे छोटे मावळे सोबत घेऊन स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. शिवाजी महाराजांनी आग्र्याहून केलेली सुटका व महाराजांनी शक्तीपेक्षा युक्ती कशी श्रेष्ठ आहे हे आपल्या पराक्रमाने दाखवून दिले आहे.हे अतिशय सुंदर व हसत खेळत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्य व विचार यांची माहिती अतिशय छान प्रकारे सांगितली.
याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.