पंढरपूर प्रतिनिधी
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ, पंढरपूर संचलित, श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, सुस्ते प्रशालेत आज थोर समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.प्रारंभी त्यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे प्राचार्य प्रा.सुधाकर पिसे यांचे हस्ते करण्यात आले. लोकांमध्ये जनजागृतीसाठी किर्तनासारखे प्रभावी माध्यम वापरून विज्ञानवादी विचारांचे विद्रोही संत गाडगे महाराज यांनी समाजात चाललेल्या निरर्थक,खूळचट अंधश्रद्धांच्या निर्मूलनाबरोबरच, स्वच्छतेचे व शिक्षणाचे महत्त्व रुजवल्याचे प्रा.पिसे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले.
यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक रणजित शिनगारे, विलास दराडे, धनंजय भाजीभाकरे, जैनुद्दीन शेख,राजेंद्र जाधव, सुरेश कट्टे, महेश देशमुख, देवदत्त वाघ,श्रीकांत चंदनशिवे, नितीन वायदंडे,प्रथमेश गावडे, नवनाथ लोणकर,बबन कोकतरे,श्रीराम खूपसे,गणेश पाटील,गणेश खिलारे,सविता इंगळे, प्रतिभा जावीर,जेष्ठ लिपीक राजकुमार ढगे,किरण बोधले, विष्णूपंत घोगले,धनाजी देठे, समाधान शेजाळ,संदीप चौधरी, राजाराम घोडके,सरस्वती शिंदे, अंजली कापसे,रोहित हेंबाडे,सुजित मोरे,संजय निंबाळकर,बाळासाहेब बनसोडे,बबन पवार,भीमा खंडाळे आदी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.