सोलापूर प्रतिनिधी
केगांव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत रक्तदान शिबीर संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ.रवींद्र व्यवहारे व डॉ. शेखर जगदे, यांच्या हस्ते झाले.
या शिबिरामध्ये १२५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरामध्ये अक्षय ब्लड बँक व शासकीय ब्लड बँक सहभागी झाल्या होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. शशिकांत लामकाने व एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.