मुंबई प्रतिनिधी
जोगेश्वरी पूर्व येथील गांधी नगर आरोग्य केंद्रातील १५ क्षय रोग रुग्णांना नुकतेच सकस आहार किराणा किट देण्यात आले.जोगेश्वरी येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांनी जानेवारी महिन्यात त्यांच्या पन्नासाव्या वाढ दिवसानिमित्त येथील पाच क्षयरोग रुग्णांना किरण किट देऊन या मोहिमेला सुरुवात करून समाजातील दानशूर आणि सामाजिक जाणीव ठेऊन कार्य करणाऱ्या मान्यवरांना येथील रुग्णांना मदत करण्याचे आवाहन केले होते.त्यानुसार आज मुंबईतील आदर्श शिक्षकआणि सामजिक जाणीव ठेऊन कार्य करणारे श्री हेमंत चौधरी यांनी पुढाकार घेऊन जोगेश्वरी येथील पंधरा रुग्णांना स्वखर्चाने सकस आहार किराणा किट दिले.
यावेळी येथील आरोग्य केंद्रप्रमुख डॉ अंजली, आरोग्य सेविका छायाताई, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर सावंत, गणेश हिरवे आदी मान्यवर उपस्थित होते.येथे जवळपास शंभरहून अधिक क्षयरोग रुग्णांची ट्रीटमेंट येथे सुरू असून अजूनही ज्यांना या मोहिमेत सहभागी होऊन रुग्णांना मदत करायची असेल त्यांनी ९९२०५८१८७८ संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.