सोलापूर प्रतिनिधी
पत्रकार सुरक्षा समिती ची सोलापूर येथे बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर कीर्तीपाल गायकवाड होते होते.
या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे खंडणी सारख्या गुन्हे दाखल झालेल्या पत्रकारांबाबत स्वतंत्र अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करणे राज्यातील पत्रकार होणारे हल्ली धमकी मारहाण पत्रकारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देणे राज्यातील पत्रकारांच्या वाहनाला टोल मधून सूट देणे या सह महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात येऊन पत्रकारांच्या प्रश्नावर आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी नूतन पदाधिकारी जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत माळवदे, जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख, जिल्हा संघटक आन्सर तांबोळी (बी एस ), सोलापूर शहराध्यक्ष राम हुंडारे शहर कार्याध्यक्ष गोविंद शेंडगे, नूतन सदस्य रविकांत रणदिवे, राहुल जाधव यांचा सत्कार पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र ओळखपत्र शाल पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांना एकत्र आणणार
राज्यात पत्रकारांचे प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत असून सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांना एकत्र आणून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत माळवदे यांनी यावेळी केलं आहे
पत्रकारांनी एकत्र आल्याशिवाय पत्रकारांचे प्रश्न सुटणार नाहीत
महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस पत्रकारांवर होणारे हल्ले मारहाण धमकीचे प्रमाण वाढले असून याबाबत राज्यातील पत्रकारांनी एकत्र येणे गरजेचे असून पत्रकारांनी एकत्र आल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत असं परखड मत पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख यांनी या बैठकीत केले आहे.
पत्रकारांच्या प्रश्नावर व्यापक स्वरूपाचे आंदोलन छेडून राज्य सरकारचे लक्ष वेधणार
गेल्या अनेक वर्षापासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर वेळोवेळी आंदोलन उपोषण निवेदन करत असून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे महाराष्ट्र राज्यात पत्रकारांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लवकरच व्यापक स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याची माहिती नूतन शहराध्यक्ष राम हुंडारे यांनी यावेळी दिली आहे.
यावेळी अभ्यासू वकील दिलीप जगताप दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद दैनिक अब तक चे संपादक प्रसाद जगताप अबूबकर तांबोळी चंद्रशेखर निम्मल विठ्ठल वटारे इत्यादी उपस्थित होते.